पहिला दिवस- पांढरा रंग
देवीचे रूप: शैलपुत्री
नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंग परिधान करण्याची परंपरा आहे. हे रंग फक्त पोशाखापुरते मर्यादित नसून त्यांना धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. देवीच्या विविध रूपांनुसार हे रंग ठरवले जातात.
आजचा रंग : पांढरा
🌸 महत्त्व :
-
पांढरा रंग पवित्रता, शांतता, साधेपणा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.
-
या रंगाचा संबंध मन:शांती व सकारात्मक ऊर्जेशी आहे.
-
पांढरा परिधान केल्याने मन स्थिर राहते, विचार स्वच्छ व स्पष्ट होतात.
-
हा रंग देवीच्या करुणामय स्वरूपाशी निगडीत मानला जातो.
हा रंग एक नवी सुरवात दर्शवितो.
🌼 आध्यात्मिक दृष्टिकोनातून :
-
साधना, भक्ती, दया आणि आत्मिक प्रगतीसाठी हा रंग शुभ मानला जातो.
-
पांढरा रंग धारण केल्याने मानसिक अस्वस्थता दूर होऊन अंतःकरणात शांती येते.
🙏 नवरात्रोत्सवाच्या आजच्या दिवशी पांढरा रंग धारण करून देवीचे स्मरण केल्यास जीवनात आनंद, समाधान व सकारात्मकता वाढते.
उद्याचा रंग लाल आहे त्याचे महत्व उद्याच्या लेखात. धन्यवाद!

No comments:
Post a Comment