लक्ष्मीपूजन माहिती
🌼 पूजनाची तयारी
-
घर स्वच्छ करून दरवाजाला तोरण बांधले जाते.
-
रांगोळी काढून पूजा स्थळ सुंदर सजवले जाते.
-
महालक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती स्थापन केली जाते.
-
नव्या किंवा स्वच्छ कपड्यांमध्ये पूजन केले जाते.
🌼 पूजा विधी
-
प्रथम गणपती पूजन केले जाते.
पूजेमध्ये आचमन, प्रार्थना, देशकाल उच्चारणे, संकल्प, श्री गणपतिपूजन, कलशपूजन, घंटीपूजन, दीपपूजन इत्यादी विधी असतात.
-
नंतर महालक्ष्मी, कुबेर आणि सरस्वती यांची पूजा होते.
-
सोनं, नाणी, हिशेब पुस्तके आणि साधने यांनाही पूजा केली जाते.
लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात.
-
आरती करून ने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना प्रसाद वाटला जातो.
🌼 विशेष गोष्टी
-
या दिवशी दिवे लावल्याने अंधार आणि दु:ख नष्ट होतात.
-
लक्ष्मी पूजनानंतर लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते अशी श्रद्धा आहे.
-
लोक एकमेकांना "शुभ दीपावली" म्हणून शुभेच्छा देतात.

No comments:
Post a Comment